शंकरपाळी हा महाराष्ट्रातील एक चविष्ट आणि सानासुधी मधील महत्वपूर्ण पाधार्त आहे. आत्ता फराळ म्हटल की सण आठवतो तो म्हणजे दिवाळी आणि विना शंकर्पल्यांच्या दिवाळी हा सण होऊच नाही शकत. जश्या चकल्या करंज्या लाडू हे पाधार्त आहेत तुम्ही शंकरपाळ्या ही अनुभवल्या पाहिजे. तर चला आज आपण बघू या चविष्ठ शंकर्पल्यांची पाककृती.
साहित्य :
अर्धा (१/२) कप दुध.
अर्धा (१/२) कप तूप. / लोणी.
(३/४) बारीक (पिठी) केलेली साखर.
साढे ३ कप मैदा.
कृती पहिली :
एका भांड्यामध्ये पहिल्यांदा तूप पिठी साखर आणि दुध एकत्र करून घ्यायचं आहे. ३-४ मिनिट मध्यम आचेवर सर्व एकत्र होईपर्यंत ते ढवळून घ्यायचं आहे. या मिश्रणाल उकळी येवू द्यायची नाही असे झाल्यास दुध फुटू शकते. तुम्ही तुपायेवजी पीठ भिजवण्यासाठी लोणी वापरलात तरी चालेल.
कृती दुसरी :
मैद्या मध्ये जे मिश्रण केलं आहे ते एकत्र करुन ते मळून घ्यायचं आहे. हा गोळा खूप घट्ट हि नको आणि पातळ हि नको मध्यम प्रमाणात मुउपाना असावा. आत्ता हा पिठाचा गोळा एक भांड्यामध्ये काढून घेवून झाकण ठेवून १ ते १.५ तास असच ठेवून द्यायचं आहे. तुम्हाल लाटताना कलेल की तुमच पीठ किती प्रमाणात भिजलाय की अजून भिजायला ठेवावा लागेल. जर ते पोळपाट लात्न्याला चिकटत नसे तर तुम्हाला पुढच्या कृती साठी जाता येई नसेल तर अजून थोडा वेळ तुम्ही त्याला झाकून ठेवू शकता.
कृती तिसरी :
१ तासानंतर जो गोळा तुम्ही घ्याल त्यातून छोटा सा भाग घेवून मस्त लाटून घ्यायचं आहे. त्या आधी त्या एकजीव करण्यासाठी हाताने मळू शकता. या पिठलं भेगा पडण साहजिक आहे. तुम्ही हा गोळा लात असताना लक्ष द्या की तुम्ही याला जास्त पातळ करू नका. लाताल्यानंतर तुम्ही त्याच्या जास्तीचा कडा कापून त्याला मोठा चौकोनी आकार द्या म नंतर त्याच्या चौकोनी किंव्हा तुम्हाला हव्या त्या आकारात छोट्या तुकड्यांमध्ये कापून घ्या. सर्व शंकर पाल्या तयार होईपर्यंत कापलेल्या शंकर पाळ्या ताटामध्ये झाकून ठेवू शकता.
कृती चौथी :
आत्ता आपल्याला शंकर पाळ्या तळयाच्या आहेत. तर तळण्यासाठी तेल माध्यम आचेवर गरम करून घ्या तेल खूप गरम असू नये आणि त्याला कूप गडात तपकिरी रंग येतो आणि आतून ती कच्चीच राहते. तेल मध्यम गरम झाल्यावर त्या मध्ये शंकरपाळ्या टाकून सर्व बाजूनी छान तांबूस रंग येयीपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. तीन चार मिनिट छान तळून घेतल्यानंतर एकसारखा रंग येतो आणि शंकर पाली मस्त फुगते मग तुम्ही त्यांना काढून घेवू शकता.
येथे आपली छान असी खुसखुशीत शंकर पाली तयार झाली आहे आता तुम्ही आपल्या कुटुंबा सोबत या चविष्ट शंकरपाळ्याचा आनंद घेवू शकता.

Keep it up♥️
ReplyDelete